सिने-नाट्य कलावंतांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले…!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑगस्ट २०२२ । सातारा । सांस्कृतिक विभाग कांग्रेस कमिटीच्या वतीने नुकतीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार मा. एकनाथजी शिंदे साहेब यांची मंत्रालयात भेट घेऊन सिने-नाट्य कलाकारांच्या समस्यांचे निवारण करण्याकरीता निवेदन देण्यात आले निवेदनाबरोबर महाराष्ट्रातील कलाकारांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी कलाकारांसोबत सभा घेण्यासंदर्भात पत्र दिले असून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सभेस वेळ देण्यास होकार दर्शविला आहे. सदर निवेदनात प्रामुख्याने गोविंदा प्रमाणे कलाकारांना देखील शासकीय नोकरी मध्ये आरक्षण देऊन विविध शासकीय सेवा उपलब्ध करुन द्यावी, गरीब कलावंतांना राहण्याकरीता भुखंड व निवासाची सोय उपलब्ध करून द्यावी, कलावंतांच्या मुलांची शिक्षणाची योग ती सोय उपलब्ध करुन द्यावी जेणे करुन गोरगरीब कलावंतांची मुले आपल्या राहणीमानाचा दर्जा ऊंचावून आपल्या कुटुंबियांचे पालनपोषण करु शकतील. असे लिखित स्वरूपात मुद्दे मांडण्यात आले. असेच निवेदन कलावंतांच्या बाबतींत महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे यांनी मुख्यमंत्री महोदयांना सादर केले होते. याप्रसंगी निवेदन देताना कांग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा. विद्या कदम, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीस तथा संघटन प्रमुख सिध्दी कामथ, महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षा, समन्वयक व प्रवक्ता फरजाना डांगे, सरचिटणीस तथा संघटन प्रमुख नागेश निमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!