दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण शहरातील महात्मा फुले चौकात काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गणपती विसर्जनातील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एकास लाकडी दांडके व हाताने मारहाण करून शिवीगाळ केल्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांविरोधात फलटण शहर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.
या मारहाण प्रकरणी अभिजीत जयवंत खराडे व सचिन जयवंत खराडे (दोन्ही रा. पवारगल्ली, रविवार पेठ, फलटण) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्याची अधिक माहिती अशी, महात्मा फुले चौकातील रात्री ११ वाजता माऴजाई मंदिराकडे जात असताना फिर्यादी श्रेयश संजय पवार (वय २६, रा. पवारगल्ली, फलटण) हा शतपावली करत असताना टपरीवरती उभे असलेले अभिजीत जयवंत खराडे व सचीन जयवंत खराडे (दोन्ही रा. पवारगल्ली, रविवार पेठ, फलटण) यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी याला लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण करत जखमी केले व शिवीगाऴ करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार फलटण शहर पोलिसात दाखल झाली आहे.
या प्रकरणी अधिक तपास होले करत आहेत.