दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण शहरातील दत्तनगरमध्ये राहणार्या शशिकांत लहू मोहिते (वय ३१, व्यवसाय – गवंडीकाम) यांचा भाऊ सोमनाथ मोहिते व त्यांची बायको अर्चना यांच्यात घरगुती कारणावरून भांडणे सुरू असताना फिर्यादी शशिकांत मोहिते हे ती भांडणे सोडविण्यास गेले असता, त्यांच्या भावकीतील पाचजणांनी ‘तू मधे का पडतोस’ असे म्हणून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी फलटण शहर पोलिसात पाचजणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश भगवान मोहिते, अतुल दत्तात्रय मोहिते, बापू कांतीलाल मोहिते, ज्ञानेश्वर कांतीलाल मोहिते व दत्तात्रय भाऊसाहेब काळे (सर्व रा. दत्तनगर, फलटण, ता. फलटण) अशी आरोपींची नावे आहेत.