वणवा लावल्या प्रकरणी कुरुळोशी येथील एकास दंड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, जावळी, दि.८:  कुरूळोशी (ता.जावळी) येथील वनक्षेत्र चंद्रकांत गेनू सपकाळ  रा. गाढवली यांनी वनक्षेत्रात वनवा लावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयाने आरोपीस कोठडी व २५०० रु. दंड ठोठावण्यात आला. अशी माहिती वनक्षेत्रपाल आर .एन. परदेशी यांनी दिली .

भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) ब,क. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.फा.क.न. २८३ मध्ये दि.०२/०२/२०२१ रोजी दुपारी १२.०० वा. वणवा लावल्या प्रकरणी वनविभागाचे कर्मचारी व सहकारी यांनी आग विझवली. त्याप्रकरणी अधिक तपास केला असता आरोपी  चंद्रकांत गेनू सपकाळ वय ७३ रा. गाढवली ता.जावली यांना संशईत म्हणून ताब्यात घेऊन वणवा लागल्या ठिकाणी पाहणी केली असता त्यांनी सांगितले की माझ्या नजर चुकीमुळे माझ्या खाचरातून वणवा वनहदीत गेला. त्याठिकाणी वन कर्मचारी यांनी संबधित कागदपत्र तयार करून आरोपी चंद्रकांत गेनू सपकाळ  रा. गाढवली यांचे विरूद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) ब,क. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. दि.०२/०२/२०२१ पासून आज दि ०८/०२/२०२१ पर्यंत तपास पूर्ण केला. तसेच  रणजीत सिंह परदेशी वनक्षेत्रपाल मेढा यांच्या मार्गदर्शनाखाली  .न्यायदंडाधिकारी मेढा यांचे कोर्ट मध्ये आरोपी सह गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने आरोपीस कोठडी व २५०० रु. दंड ठोठावण्यात आला. गुन्हे कामी  केळघर वनरक्षक मीरा  कुटे , वनपाल मेढा रामचंद्र परधाने , श्रीरंग शिंदे वनपाल , वनरक्षक भामघर व्ही जी बेलोशे यांनी मोलाची कामगिरी बजावली.


Back to top button
Don`t copy text!