ए. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वर्गमित्रांचे ‘गेट टुगेदर’

होमिओपॅथिक डॉक्टर आणि कॉलेजचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील - डॉ बाहुबली शहा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ जानेवारी २०२५ | फलटण |
पुणे येथे ५ जानेवारीला ए. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बेळगावीच्या वतीने सत्कार करण्यात आल्यानंतर सत्काराला उत्तर देताना मार्गदर्शन करताना प्रशासक, महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ होमिओपॅथिक मुंबईचे डॉ. बाहुबली शहा यांनी राज्यात अनेक ठिकाणी नवीन शासकीय होमिओपॅथिक हॉस्पिटल आणि होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला.

ए. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वर्गमित्रांचे ४५ वर्षानंतर ‘गेट टुगेदर’ झाले. त्याप्रसंगी डॉ. शहा बोलत होते. या कॉलेजचे वर्गमित्र ४५ वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते. पुढची भेट अमेरिका येथे २०२७ साली करावी, अशी सूचना अनिल ओझर्डे यांनी यावेळी केली. कारणही तसेच आहे. १९७७-७८ साली बेळगाव येथे प्रवेश घेवून आपण एकत्र शिकलो. २०२७-२८ ला अर्धशतक पूर्ण होत आहे. त्यानिमित्त गौतम व अंजली करंदीकर यांनी तसे आमंत्रण आजच सर्वांना दिले.

सध्या ‘सीसीएमपी’ कोर्स पूर्ण केलेले सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथिक औषधे देऊन इलाज करण्यास परवानगी आहे, त्याचे नवीन परिपत्रक २६ डिसेंबर २४ रोजी प्रसिद्ध झाले आहे. मात्र, अजून पुढे जावून शासकीय रुग्णालयात होमिओपॅथिक औषधे देवून इलाज होत नाही, ते करण्यासाठी वेळ लागेल; पण प्रयत्न करून लोकांची इच्छा असेल तर सध्याचे सरकार नक्कीच मदत करेल. यात डॉ. रजनीताई इंदलकर व सर्व काऊन्सिल मेंबरचे सहकार्य लाभले. यामुळे शासकीय सेवेत आपल्या डॉक्टरांना संधी निर्माण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक सादरीकरणात २४९ पानी अहवाल सादर केला असून लवकरच त्याचा पाठपुरावा करून तुम्हा सर्वांच्या सहकार्याने होमिओपॅथिक डॉक्टरांना संधी निर्माण करणारे निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे यावेळी डॉ. शहा यांनी सांगितले.

याप्रसंगी पूर्वाश्रमीचे सर्व सहकारी बेळगाव येथे शिकलेले डॉक्टरांच्या वतीने डॉ. बाहुबली शहा, गौतम करंदीकर, डॉ. अंजली करंदीकर, डॉ. सोमनाथ गोसावी, डॉ. डी. के. पाटील, डॉ. सुधीर म्हात्रे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

गौतम करंदीकर यांनी जरा वेगळ्या क्षेत्रात काम करत अमेरिका येथील प्रसिद्ध एचटीसी कॉम्पुटर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर ते डायरेक्टर असा प्रवास यशस्वी करून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. ते भारतात आल्याचे व बाहुबली शहा यांची प्रशासक पदावर नियुक्तीबद्दल सत्कार समारंभ संपन्न झाला. अंजली करंदीकर याही अमेरिकेत भारतीय व महाराष्ट्रीयन संस्कृतीचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करतात.

यावेळी सर्व मित्रांच्या वतीने गौतम करंदीकर, डॉ. बाहुबली शहा यांना सन्मानपत्र, शाल देवून सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. राजू शहा, डॉ. लाला जाधव, डॉ. रवी मगदूम, डॉ. गिरीष देशमुख व डॉ. शिवाजी गावडे, डॉ. प्रदीप देसाई, डॉ. नरेंद्र व्यास यांनी सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!