कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि.21: कोरोना आजाराची लस बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या लस निर्मात्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील प्लँटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सीरम इंस्टिट्यूटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीचा लस निर्मितीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर जवळील गोपाळ पट्टीत असणाऱ्या सीरमच्या प्लँटमधील नवीन इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलास दुपारी अडीच वाजता आगीची घटना समजली आणि तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून, अगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.


Back to top button
Don`t copy text!