स्थैर्य, मुंबई, दि. १ : ” विविध क्षेत्रातील संस्था व दानशूर मान्यवरांनी मदतीचा हात पुढे करावा. बकरी ईद, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती चे औचित्य साधून सहकार्य करित उपक्रमाद्वारे केले विनंती आवाहन ”
जगाला भेडसावणाऱ्या कोविड 19 च्या वाढत्या प्रदुभावाने सर्व स्तरातील नागरिक हतबल झाले आहेत.आरोग्य बरोबरच आर्थिक समस्याचे संकटाला सामोरे जात असताना समाजातील अनेक स्तरातील घटकांना उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे अनेक लोककलावंत, पारंपरिक उद्योग, विविध प्रार्थना व धार्मिक स्थळे लघु व मध्यम उद्योग, सुक्ष्म जिवी कामगार सर्वांनाच उदरनिर्वाह करणे जिकिरीचे झाले आहे शासन स्तरावरून कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजना आखल्या जात आहेत. सुमारे 05 महिने लाॅकडाऊन मुळे सर्व सामान्य नागरिकांना उदरनिर्वाह करताना मेटाकुटीला येऊन जगावे कि मरावे असा प्रश्न सतावत असताना अनेक सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील दानशूर मान्यवरांचे मदतीचे हात सरसावले आहेत परंतु एक घटक असा आहे की तो या मदतीविना वंचित राहीला आहे तो म्हणजे तृतीयपंथ . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तृतीयपंथी नागरिकांची राज्यातील स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. जेवण व औषधोपचार न मिळाल्याने जगणे मुश्किल झाले आहे.
सामाजिक जिवनात मदत लांबच ज्या माता पिता ने जन्म दिला तेव्हा मुलगा जन्माला आली तर वंशाचा दिवा व मुलगी जन्माला आली तर लक्ष्मी /धन की पेटी अशी उपमा देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येतो परंतु ते मुल नपुसकलिंगी जन्माला आले तर समाजात जनमानसातील पत कमी होण्याच्या भितीने त्यांचे छत्र हिरावून घेतले जाते व पोरके केले जाते तेव्हा शिक्षण व आवश्यक संस्कार न मिळाल्याने घावेल त्या वाटेने पुढे जिवनाचा प्रवास करावा लागतो अपवादात्मक परिस्थितीत काहींना शिक्षण मिळते पण रोजगार नोकरी मिळणे अवघड होते अशातच समस्त जगावर कोरोना व्हायरस संसर्गजन्य आजाराने थैमान घातल्याने या घटकांवर पैसे मागणे, नाचणे आदी धार्मिक कार्ये शासनाने निर्बंधानुसार बंद झाल्याने या तृतीयपंथींना घरीच राहून कुठुन तरी मदतीचे हात येतील या केविलवाण्या अपेक्षेत वाट पहात असताना कोणाचा हि आधार न मिळाल्याने तृतीयपंथींच्या संग्राम नामक संघटनेने समाजातील विविध क्षेत्रातील संस्था संघटनांना सहकार्य मिळावे म्हणून साद घातली व आपल्या व्यथा मांडल्या या व्यथा पुर्णपणे समजून घेऊन सातारा जिल्ह्यातील सर्व प्रथम साथ प्रतिष्ठाण या सामाजिक संघटनेचे वतीने त्यांच्या साद ला प्रतिसाद देत लोणंद शहरातील विविध क्षेत्रातील दानशूर मान्यवरांच्या सहकार्यातुन 150 किलो गहु ,185 किलो तांदूळ, साखर 25 किलो, तेल 15 किलो (1 डबा ), शेंगदाणे 06 किलो, शाबुदाणे 05 किलो, मुंगडाळ, तुरडाळ, आख्खा मसुर,हरभरा, चवळी प्रत्येकी 10 किलो, चहा पावडर 01 किलो, विविध मसाले पॅकेट्स तसेच मास्क, सेनिटायझर, अरसेनिक अल्बम औषधे डब्बे आदी जिवनावश्यक साहित्य मौजे वाठार स्टेशन येथे जाऊन या संग्राम संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रशांत उर्फ प्रणिती वारकर व त्यांच्या सहकाऱ्यांना स्पुर्द करत या तृतीयपंथी नागरिकांना उचित सन्मान देत सहकार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भावणिक होऊन आम्हाला साथ प्रतिष्ठानचे माध्यमातून माणूसकी चा आधार मिळाला अशी प्रतिक्रिया प्रणिती वारकर यांनी व्यक्त केली व समाधानी होत आभार मानले.
यावेळी साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, कार्याध्यक्ष स्वप्नील बुरुंगले, संघटक रोहित शेलार, आय्याजभाई सय्यद, सुमित भोईटे, मुकुंदराज काकडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व तृतीयपंथी नागरिक उपस्थित होते.