दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
महसूल सप्ताह दिन १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२३ निमित्त ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी तृतीय पंथीयाच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी तहसील कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना महसुली कामांसाठी सर्वत्र फिरावे लागू नये व त्यांची सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत यासाठी ‘एक हात मदतीचा’ म्हणून आजपासून ‘एक खिडकी योजने’ची सुरूवात करण्यात आली.
‘एक खिडकी योजनें’तर्गत कामे अनेक, संपर्क एक या ब्रिदखाली रेशनकार्ड, मतदान कार्ड, दाखले, विशेष लाभ योजना, अभिलेख नक्कल प्रत, महसुली न्यायालयासंदर्भातील कामे इ. कामे करण्यासाठी तृतीय पंथियांना सेवा उपलब्ध होणार आहे.
याची संकल्पना उपविभागीय अधिकारी फलटण श्री. सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव व अप्पर तहसीलदार श्री. मयूर राऊत यांनी राबविली आहे.