संकल्प ट्रस्टतर्फे एक हात मदतीचा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, अलिबाग, दि. २७ : कोरोना व्हायरस कोव्हिडं – १९ वैश्विक महामारी तसेच निसर्ग चक्रीवादळ या दुहेरी आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या व बेरोजगारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रुपग्रामपंचायत बोरघर हद्दीतील “गंगेची वाडी” या आदिवासी वाडीत चेंबूर येथील विनोदजी हिवाळे संचालित “संकल्प ट्रस्टने” मदतीचा हात पुढे करत वाडीमधील सर्व ६० परिवारांस राशन किट, कोलगेट, फेसमास्क, सॅनिटरी पॅड अश्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप प्रत्यक्ष वाडीवर जाऊन केले सदर वाटप संकल्प ट्रस्टचे अध्यक्ष विनोद हिवाळे, ट्रस्टचे सदस्य विक्रम हिवाळे, राहुल कटारे, अमोल हिवाळे, मनीष हिवाळे तसेच बोरघर ग्रुपग्रामपंचायतचे माजी सरपंच मधुकर ढेबे, माजी सरपंच पुष्पा लेंडी, जिल्हापरिषद सदस्य मधु पारधी, ग्रामपंचायत सदस्य नारायण पिंगळे, पुरोगामी युवक संघटना अलिबाग सदस्य उत्तमभाई रसाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

हातावर पोट असणाऱ्या आदिवासी बंधू-भगिनींना लॉकडाऊनमुळे बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागत असताना संकल्प ट्रस्टने केलेल्या मदतीमुळे साऱ्यांनाच गहिवरून आले सदर वाटपानंतर अध्यक्ष विनोदजी हिवाळे यांनी उपस्थितीतांस कोरोना बचावात्मक उपाययोजना, सोशल डिस्टनसींग व स्वयंम सुरक्षा यावर मार्गदर्शनात्मक माहिती देत उपस्थित लाभार्थी व मान्यवरांचे आभार व्यक्त केले तसेच सदर कार्याचे स्थानिक पातळीवर सुयोग्य नियोजन केल्याबद्दल उत्तमभाई रसाळ तसेच संकल्प ट्रस्टने सदर मदत करावी असे आव्हान केल्याबद्दल प्रवीण रा. रसाळ यांचे विशेष आभार व्यक्त केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!