दैनिक स्थैर्य । दि. २२ ऑगस्ट २०२२ । बारामती । ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध सापांच्या जाती तसेच सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची काळजी व त्यावर उपायोजना याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन ग्रीन वर्ड फाऊंडेशनचे अमर शिंदे व त्यांच्या टिमच्यावतीने विद्यार्थ्यांना देण्यात आले. दंश केलेला साप कोणत्या जातीचा विषारी का बिनविषारी यासाठी फोटो काढावा कि नाही, याचबरोबर साप आपल्या घराजवळ येऊ नयेत याबाबत उपाय योजना, विषारी व बिनविषारी साप ओळखणे, साप कातीन का व कसी टाकतो,सापांच्या विविध जाती,त्यांचे अन्न,रहिवास याबाबत सविस्तरमाहिती बरोबरच विद्यार्थ्यांनच्या शंकाचेही निरसन करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे, संस्थेचे सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेशमा गावडे,संचालिका पल्लवी सांगळे, दिपक सांगळे, दिपक बिबे, वर्षा भरणे सीईओ संपत जायपात्रे,विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे आदी उपस्तित होते