दैनिक स्थैर्य | दि. ०९ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
सालाबादप्रमाणे संभाजी ब्रिगेड विडणी, माझेरी कडून दि. १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यावेळी भव्य शाही मिरवणूक व शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिवजयंतीला विडणीतील ग्रामपंचायत कार्यालयासमोर हनुमान मंदिरात श्री. रवीकुमार थोरवे सर यांचे ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरू’ या विषयावर शिवव्याख्यान सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. त्यानंतर रात्री ७.३० वाजता भव्य शाही मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत छावा ७२ टायगर सिरीज साऊंड न्यू ओपनिंग साई लाइट्स शोकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे.
तरी या भव्य शाही मिरवणुकीमध्ये विडणी व पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेड विडणी-माझेरीकडून करण्यात आले आहे.