
दैनिक स्थैर्य | दि. ०७ मार्च २०२५ | फलटण | भारतीय जनता पार्टी फलटण शहर व माऊली फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या शनिवार दि. ०८ मार्च रोजी भव्य लावणी महोत्सव, अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
फलटण शहरातील बारस्कर गल्ली येथील अवस्थान मंदिराच्या समोर असणाऱ्या अहिंसा मैदानावर दि. ०८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तर या कार्यक्रमास सौ. मनीषा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे.