साखरवाडी येथे शिवजयंतीला भव्य-दिव्य मिरवणूक; ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दणाणला


दैनिक स्थैर्य | दि. २४ एप्रिल २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरेप्रमाणे फलटण शहराबरोबर संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यानुसार दि. २२ एप्रिल रोजी साखरवाडी, ता. फलटण येथे अतिशय भव्य, दिव्य मिरवणुकीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ढोल-ताशे, हलगी व डीजेच्या तालात, फटाक्यांच्या आतिषबाजीने व ’जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

प्रारंभी रायगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे पिंपळवाडी गावातून व साखरवाडी बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर महिलांच्या हस्ते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढी पुतळ्याला जल व दुग्धाभिषेक करण्यात आला.

सायंकाळी शिवाजी महारांजाच्या पुतळ्याला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी निघालेल्या भव्य शोभा यात्रेत बजरंगबली हनुमानांचा जिवंत देखावा प्रमुख आकर्षण ठरले होते.

शिवजयंतीस शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे सर्व कार्यकर्ते व साखरवाडी पंचक्रोशीतील हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!