दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । फलटण । येथील जानुबाई प्रॉपर्टीजच्यावतीने फलटण शहरानजिक साकारत असलेल्या जानुबाई सिटीमध्ये एन.ए. प्लॉट खरेदी करुन आपल्या स्वप्नातला बंगला साकारण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडणार्या किंमतीत एन.ए. प्लॉट उपलब्ध असून प्रकल्पातील 60% बुकींग पूर्ण झाले आहे. तरी आता मोजकेच प्लॉट शिल्लक राहिले असल्याने ग्राहकांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन, जानुबाई प्रमोटर्सचे विनोद घाडगे व प्रविण शिंदे यांनी केले आहे.
सदर प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देताना घाडगे आणि शिंदे यांनी सांगितले की, फलटण शहरापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर राजीव गांधी पॉलिटेक्नक कॉलेजच्या जवळ एन.ए. प्लॉटचा हा प्रकल्प जाधववाडी (ता.फलटण) गावच्या हद्दीत सर्व्हे नं.10/ब मध्ये आम्ही साकारला आहे. प्रकल्पातील सर्व प्लॉट कलेक्टर एन.ए. आहेत. प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पाच्या जवळून गेलेला असून कमिन्स मेगासाईटपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प आहे. प्रत्येक प्लॉटसाठी स्वतंत्र 7/12 व स्वतंत्र नकाशा, मुख्य रस्त्यालगत व अंतर्गत रस्त्यालगत वनराईचे सुशोभीमकरण, भव्य 40 फुटी मेन रोड, 20 व 30 फुटी अंतर्गत रस्ते, मुबलक पाण्याची व विजेची सुविधा, निसर्गाच्या कुशीत रम्य व शांत परिसर, कर्जसुविधा उपलब्ध अशा सर्व सोयींनी उपयुक्त प्लॉटस याठिकाणी उपलब्ध आहेत.
ग्राहकांचा सदर प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 60% बुकींग पुर्ण झाले आहे. 2.5, 2.2 आणि 3.3 गुंठ्यांचे विकसित प्लॉटस् या ठिकाणी उपलब्ध असून अधिक माहितीसाठी विनोद घाडगे (7058781212), प्रविण शिंदे (9765140260) यांचेशी अथवा आमच्या श्री जानुबाई निवास, फलटण – खुंटे रोड, हॉटेल जय शेजारी, शेती शाळा नजिक, फलटण येथील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही जानुबाई प्रॉपर्टीजच्यावतीने करण्यात आले आहे.