जिल्ह्यात इलेक्ट्रिक मोटार चोरी करणारे टोळी जेरबंद; दोन लाख ३६ हजाराच्या ४३ इलेक्ट्रिक मोटारी जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जानेवारी २०२३ । सातारा । सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून जेरबंद केले आहे .त्यांच्याकडून दोन लाख छत्तीस हजार रुपये किमतीच्या 43 इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आले आहे अभय जनार्दन चव्हाण राहणार पेरले तालुका कराड ,अप्पा रघुनाथ सातपुते राहणार पेरले तालुका कराड , गणेश बाळासो कांबळे राहणार पेरले तालुका कराड, गणेश महेंद्र चव्हाण राहणार पेरले तालुका कराड, शुभम कालिदास जेटी थोर राहणार कालगाव, साहिल कालिदास जेटी थोर , कपिल सत्यवान जेटी थोर राहणार कालगाव तालुका कराड असे आरोपींची नावे आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये विहिरीवरील मोटार चोरींचे बरेच गुन्हे घडले होते . त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान होत होते सदरचे गुन्हे उघडली चालण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला मार्गदर्शन केले .त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना 9 जानेवारी 2023 रोजी पेरले तालुका कराड गावातील काही जणांनी कराड तालुक्यातील कालगाव, पेरले, भुयाचीवाडी खराडे इत्यादी गावांमध्ये इलेक्ट्रिक मोटरी चोरल्याची माहिती प्राप्त झाली.

संबंधित आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली संबंधित आरोपींनी उंब्रज बोरगाव तळबीड या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे कबूल केले चोरट्यांकडून चोरीस गेलेल्या 43 मोटारी जप्त करण्यात आले असून या गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य व मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे ज्या नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या विहिरीवरील किंवा नदीवरील इलेक्ट्रिक मोटारी चोरीस गेल्या आहेत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथे संपर्क साधावा असे आवाहन अरुण देवकर यांनी केले आहे.

या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, रमेश गरजे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील,मदन फाळके ,उत्तम दबडे ,संतोष पवार, आतिश गाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ ,शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार ,मोहन पवार, रोहित निकम ,सचिन ससाने, धीरज महाडिक, वैभव सावंत ,पृथ्वीराज जाधव यांनी सहभाग घेतला होता.


Back to top button
Don`t copy text!