कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी 8 जणांची टोळी जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२१ । सातारा । तरडगाव, ता. फलटणजवळ रेल्वे पुलावर पाच चोरट्यांनी कारचालकास कोयत्याचा धाक दाखवून काच फोडली व 5 लाखांची रोख रक्कम, 25 हजारांचा मोबाईल व कारची चावी असा ऐवज जबरीने लुटला होता. या गुन्ह्याचा छडा लोणंद पोलिसांनी लावला असून एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 4 लाखांची रोख रक्कम व मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे व चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

या जबरी चोरीचा गुन्हा लोणंद पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार लोणंद, शिरवळ व फलटण शहर पोलिस ठाण्यांच्या चार वेगवेगळ्या टीम बनवून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा आधार घेत तपास सुरू करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी लोणंद ते जेजुरीपर्यंत मागोवा घेत दि. 12 रोजी एका आरोपीस ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून शिरवली, ता. भोर येथून एकास ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता पुण्यातील इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. या गुन्ह्यासाठी पुण्यातील आरोपीची ओळख करून त्याच्याशी संपर्क करून देणार्‍या आरोपीस बसमत, जि. हिंगोली येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेवून त्यास लोणंद येथे आणण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले. त्यानंतर उर्वरित आरोपींना कात्रज, बिबवेवाडी परिसरातून ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या सुचनेनुसार डीवायएसपी तानाजी बरडे, लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, उपनिरीक्षक स्वाती पवार, महेश सपकाळ, अविनाश नलवडे, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, विठ्ठल काळे, अभिजीत घनवट, सागर धेंडे, अविनाश शिंदे, फैयाज शेख, गोविंद आंधळे, केतन लाळगे, ज्ञानेश्वर साबळे, विजय शिंदे, तसेच शिरवळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर आरगडे, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड, फलटण शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल कदम, सुजित मेंगावडे, अच्युत जगताप यांनी केली.

गुन्ह्यांतील निर्णयांची नावे
1. दत्तात्रय किसन शिरवले वय 19 रा. रा. शिरवली, ता.भोर जि.पुणे
2. विशाल लक्ष्मण शिरवले वय 20 रा.शिरवली
3. कृष्णा आनंद चव्हाण वय 23 रा. आसेगाव, ता. बसमत, जि. हिंगोली
4. रोहन सचिन भालके वय 18 रा. सच्चाईमाता मंदिर, कात्रज, पुणे
5. शिव उन्नाप्पा राठोड वय 21 रा. चैत्रबन वसाहत अपर, इंदिरानगर बिबवेवाडी, पुणे.
6. पवन विकास ओव्हाळ वय 20 रा. चैत्रबन वसाहत अपर, इंदिरानगर बिबवेवाडी, पुणे.
7. राजू अशोक जाधव वय 20 रा. माणगाव हिंजवडी पुणे.
8. प्रमोद ऊर्फ बारका श्रीकांत पारसे वय 21 वर्ष रा.संतोषनगर, जैन मंदिराजवळ भारती विदयापीठ पुणे


Back to top button
Don`t copy text!