मठाचीवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ; एका दुकानासह तीन घरे फोडली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ मार्च २०२३ | फलटण |
मठाचीवाडी (तालुका फलटण, जि. सातारा) गावात दि. २३ मार्चच्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका दुकानासह तीन घरे फोडून सुमारे ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम लंपास केली आहे. या घरफोडींमुळे गावात घबराट पसरली असून या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस अज्ञात चोरट्यांविरध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीची फिर्याद तुकाराम भांडवलकर (रा. मठाचीवाडी, सध्या रा. कुळकी, ता.फलटण) यांनी दिली आहे.

या घरफोडींची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. २३/३/२०२३ रोजी रात्री १२.०० ते दिनांक २४/०३/२०२३ रोजी पहाटे ०५.०० वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मठाचीवाडी (तालुका फलटण) येथील माझ्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कटावणीने उचकटून दरवाजा उघडून आत प्रवेश केला व स्वयंपाक खोलीतील लोखंडी वस्तू कपाटातून चोरून नेल्या आहेत. तसेच वरील कालावधीत आमच्या गावातीलमोहन दिनकर जाधव यांचे दुकान फोडून ३०० रुपये, बजरंग पांडुरंग खाडे यांचे घर फोडून २५००० रुपये व किरण हनुमंत धुमाळ यांचे घर फोडून १०००० रुपये असा एकूण ४५,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरून नेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आरगडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!