दैनिक स्थैर्य । दि. १ जुलै २०२१ । पाचगणी । कोरोना नियम पाळणे सक्तीचं केले असतांनाही लोक नियमांना पायदळी तुडवीत असल्याने पांचगणी पोलिसांनी कारवाईचा धडाका लावत एकाच आठवड्यात 161 केसेसंतर्गत 62,200 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पाचगणीत विनामास्क फिरणे, सुरक्षित अंतर न राखणे असे प्रकार सुरूच असल्याने सपोनि सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी याविरोधात मोहीम उभारली आहे. या मोहिमेंतर्गत विनामास्क फिरणार्या 61 केसेस करण्यात आल्या आहेत तर सुरक्षित अंतर न राखणे 100 केसेस करण्यात आल्या आहेत. अशा एकूण 161 केसेसंतर्गत 62 हजार 200 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.