सातारकर नाट्य रसिकांना मेजवानी 

हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा; 21 नाटकांचे सादरीकरण


स्थैर्य, सातारा, दि. 1 नोव्हेंबर : सांस्कृतिककार्य संचालनालयाच्या वतीने 64 व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची सातारा जिल्हा केंद्राची प्राथमिक फेरी येथील शाहू कलामंदिरात सहा नोव्हेंबरपासून सुरू होईल. या स्पर्धेत 21 नाटकांचे सादरीकरण केले जाणार असून, 27 नोव्हेंबरपर्यंत रसिकांना विविध विषयांवरील नाटकांची मेजवानी मिळणार आहे. दररोज सायंकाळी सात वाजता नाटकाचे प्रयोग होतील. प्रत्येक प्रयोगासाठी 10 रुपये आणि 15 रुपये असा तिकीट दर आहे. नवोदितांसह नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत, अशी माहिती समन्वयक कल्याण राक्षे यांनी दिली.

या नाटकांचे होणार सादरीकरण..

सहा नोव्हेंबर आधी बसू मग बोलू (लेखक विद्यासागर अध्यापक, दिग्दर्शक वैभव तांबेकर, अद्वैत रंगभूमी, सातारा) सात नोव्हेंबर – दास्ता (डॉ. हेमंत कुलकर्णी, बाळकृष्ण शिंदे, आझाद हिंद प्रतिष्ठान सातारा) आठ नोव्हेंबर – आम्ही दोघेच राहायचो घरात (विक्रमसिंह बल्लाळ, जागृती नाट्य कलामंच, कुसवडे, सातारा) नऊ नोव्हेंबर नथिंग इज फेअर (राजीव मुळे, लोकरंगमंच, सातारा), 10 नोव्हेंबर चौक (नीलेश भोसले, मित्रमेळा फाउंडेशन, जावळी) 11 नोव्हेंबर – आयाम (अमित देशमुख, अझीम पटेल, नेहरू युवा मंडळ, शेंद्रे, सातारा), 12 नोव्हेंबर – शिवराज्याभिषेक (अमित देशमुख, निर्मिती नाट्य संस्था, सातारा), 14 नोव्हेंबर – दहा जून (अमित देशमुख, अरविंद पाटील, परिवर्तन नवतरुण मित्र मंडळ), 15 नोव्हेंबर – व्हाइट पेपर (इरफान मुजावर, मंदार शेंडे, प्रतीक थिएटर्स, वाई), 16 नोव्हेंबर खानदानी (जगदीश पवार, शरद लिमये,पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट, सातारा). 17 नोव्हेंबर सूर्यास्ताच्या अंतिम किरणांपासून सूर्योदयाच्या प्रथम किरणापर्यंत (अमोल पालेकर, रवींद्रइनामदार, शाहू कलाकादमी, सातारा) 18 नोव्हेंबर ऐन चौकीत अर्ध्या रात्री (संकेत तांडेल, विजय कातकर, शिवशक्ती सांस्कृतिक कला नाट्य मंडळ कुकुडवाड) 19 नोव्हेंबर- पोकळ घिस्सा (संतोष पाटील, शिवशक्ती तरुण मंडळ, सातारा) 20 नोव्हेंबर आमच्या हिचं प्रकरण (सचिन मोटे, हेरंब जोशी, श्री केशवराव पाटील ट्रस्ट, सातास) 21 नोव्हेंबर – चार दिवस प्रेमाचे (रत्नाकर मतकरी, इमरान मोमीन, सृजन फाउंडेशन, सातारा) 22 नोव्हेंबर वास्तवाचा विस्तव (समीर मोरे, सिद्धेश नेवसे, सूर्यरत्न फाउंडेशन, सातारा) 23 नोव्हेंबर खेळ मांडीयेला (विशाल कदम, रोहित भोसले, द स्टेज फाउंडेशन, सातारा) 24 नोव्हेंबर – सासूबाईंचं असंच असतं (प्रताप गंगावणे, रवींद्र डांगे, थिएटर वर्कशॉप ऑर्गनायझेशन) 25 नोव्हेंबर – नामयाची दासी (मिलिंद खरात, शुभम राणे, ट्रस्ट मानवता चॅरिटेबल ट्रस्ट, वाई) 26 नोव्हेंबर पाहिजे जातीचे (विजय तेंडुलकर, संदीप जंगम, तुषार भद्रेज दास्तान अकादमी ऑफ आर्टस्) 27 नोव्हेंबर – बळ (दिलीप जगताप, किरण पवार, युथ थिएटर कला शैक्षणिक व सामाजिक संस्था, सातारा).


Back to top button
Don`t copy text!