आदिवासी दिनाचे औचित्य साधुन रानभाज्या प्रदर्शन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 10 ऑगस्ट 2024 | फलटण | डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अधिनस्त कृषि विज्ञान केंद्र रोहा मार्फत आणि कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असलेल्या “कृषी संजीवनी” आणि “निसर्गमित्र” गटाने रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील खांब गावात ९ आँगस्ट या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे औपचारिक आयोजन ग्रामपंचायत खांब सभागृहात करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर कृषि विज्ञान केंद्राचे प्रा. जीवन आरेकर, डॉ. राजेश मांजरेकर, प्रा.सुधाकर पाध्ये, डॉ.प्रमोद मांडवकर, खांब गृप ग्रामपंचायतिचे उपसरपंच मा. श्री. दत्ता वातेरे, माजी सरपंच श्री. रामचंद्र चितळकर, माजी सरपंच श्री. प्रकाश थिटे, ग्रामपंचायत सदस्या सौ. रचना टवळे, पोलीस पाटील श्री. मनोज सावरकर, आणि कृषी सेवक सौ. मोनिका फडके श्री. गाडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर शास्त्रज्ञांनी शेतक-यांना रानभाजी व शेती विषयक विषयांवर मार्गदर्शन केले. श्री. चितळकर व श्री. वातेरे यांनीहि आपले मनोगत व्यक्त केले. व कार्यक्रम खांब गावात आयोजित केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. प्रदर्शनादरम्यान विविध प्रकारच्या एकूण २० रानभाज्यांची ओळख करून देण्यात आली, तसेच त्यांचे औषधी गुणधर्म भित्तीपत्रकाद्वारे सविस्तरपणे उलगडण्यात आले.
कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांब मधील शिक्षक व विद्यार्थी, तसेच स्थानिक शेतकरी आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, रोहा केंद्र प्रमुख डॉ. मनोज तलाठी व प्रा. जीवन आरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!