खेळते भांडवल या विषयी उपविभागीय कृषी कार्यालयात चर्चा सत्र संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । सातारा । शेतकरी उत्पादक कंपनी, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी संस्था ह्यांना खेळते भांडवल उभे करणे हा मुख्य प्रश्न असतो, याबाबतचे चर्चा सत्र उपविभागीय कृषी कार्यालय, सातारा येथे संपन्न झाले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापक व्यापार कुशाग्र मुंगी यांनी शेतकरी उत्पादक कंपनी, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी संस्था यांना तारण उभे करण्यासाठी खूप मोठी मशागत होते . आपल्याला आउटपुट मार्केटिंग म्हणजे खरेदी विक्री करणे सोपं व त्यासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुढाकार घेत आहे. ह्या साठी आपल्याला किमान २००० चौ. फुट जागा असणे गरजेचे आहे. जागेमध्ये ट्रक उभा होईल एवढी व वाहतूक कोंडी होणार नाही असे असणे गरजेचे असणार आहे. हे खेळते भांडवल कोणत्याही प्रकारच्या व्याज दारात सूट मिळणार नाही. रक्कम सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. संस्थे सोबत किमान ३०० सभासद असणे अनिवार्य व बंधनकारक आहे, हे सभासद MCA (कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय) मध्ये कंपनी सचिव ह्यांच्या माध्यमातून जोडण्यात येतात, हि यादी बँक तपासते जर त्यांना त्रुटी अनुभवली तर संस्थेचे कर्ज नाकारू शकते. ह्या रकमेचे १००% फक्त आणि फक्त माल खरेदी म्हणजे आउटपुट मार्केटिंग साठी नुसते करण्यात येईल. नवीन संस्थाच्या सोबतही याचा लाभ घेता येईल. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल शिवाजीनगर पुणे ह्यांचे नावाने पत्र, संस्थेने आपल्या लेटर हेड वर PDF मध्ये घेऊन सदर फॉर्म सोबत जोडावे.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे कृषी निविष्ठा विभागाचे प्रमुख पांडुरंग जाधव यांनी शेतकरी उत्पादक कंपनी, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी संस्था यांना खतांचा व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत माहिती दिली तसेच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ शेतकरी उत्पादक कंपनी, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी संस्था यांना कशा प्रकारे खत पुरवठा करते या बाबत मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे राज्य विभागीय प्रमुख सादिक मानेरी यांनी महामंडळा मार्फत चालेल्या उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले तसेच DPR बनवणे, OD Facility यासंदर्भात मार्गदर्शन केले. नाबार्डचे चौधरी यांनीही विविध योजनांवर मार्गदर्शन केले.

यावेळी नाबार्डचे राजेंद्र चौधरी, खटाव तालुका कृषी अधिकारी जितकर, सातारा जिल्हा विभागीय व्यवस्थापक रणजित खोराटे, कोरेगाव- खटाव तालुका क्षेत्रीय व्यवस्थापक तेजस कदम उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!