दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२२ । सातारा । बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत पर्यटन समितीच्या विद्यमाने समितीचे सभापती, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर, उपसभापती विनोदजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी कार्याध्यक्ष किशोरजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत, सरचिटणीस राजेशजी घाडगे, खजिनदार नागसेन गमरे यांच्या सहकार्याने, पर्यटन समितीचे अध्यक्ष मुकुंद महाडिक, सरचिटणीस सुरेश मंचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक दास कांबळे, श्रीधर साळवी, अंकुश सकपाळ, राजाभाऊ तथा रामदास गमरे यांच्या सहाय्याने सदर शिष्टमंडळ बौद्ध धम्माच्या धार्मिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या धम्म स्थळांना भेट देण्यासाठी रवाना झाले आहे.
सदर शिष्टमंडळ सारनाथ, बुद्धगया, उरुवेला, निरंजना नदी, सुजाता महाल, सुजाता खीरदान स्थळ, राजगिर (रोप वे), विश्वशांती स्तूप, जपानी बुद्ध विहार, नालंदा विश्वविद्यालय, वेणूवन असे भ्रमण करीत सध्या वैशालीत दाखल झाले आहे, तथागत गौतम बुद्धांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या भूमीस प्रत्यक्ष भेट देऊन तिथली माहिती संकलित करून वास्तववादी इतिहास जनमानसात प्रचलित व प्रसारित करून समाजात जागृती निर्माण करण्यासाठी शिष्टमंडळातील मान्यवर परतीचा प्रवास झाल्यावर आपापल्या विभागात संकलित केलेल्या माहितीचा प्रचार व प्रसार करून बौद्धधम्माची नव्याने ओळख समाजाला करून देणार आहेत, जेणेकरून परकीय व अर्वाचीन संस्कृतीद्वारे झालेल्या हल्ल्यात लोप होत चाललेल्या जगातील सर्वात प्राचीन व आदिम बौद्ध धम्माला पुनर्जीवित करून आपला सांस्कृतिक वारसा पिढीदरपिढी पुढे जात राहील या हेतूने सदर शिष्टमंडळ प्रयत्नशील आहे.
संस्थेचे गाईड मा. मुकुंद महाडिक, मा. सुरेश मंचेकर, मा. दास कांबळे हे संपूर्ण शिष्टमंडळास व्यवस्थित सांभाळून योग्य असे मार्गदर्शन करीत पुढील प्रवास करीत आहेत असे प्रतिपादन श्रीधर साळवी, अंकुश सकपाळ, राजाभाऊ तथा रामदास गमरे यांनी संस्थेद्वारे काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.