दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२३ । मुंबई । तैवान येथील पाऊ चेन ग्रुपच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी उपाध्यक्ष यांग हसियो तुंग, अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उद्योग विकास आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य असून विविध क्षेत्रात उद्योगात आणि विस्तारासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी आहेत. उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करून देत पूर्ण सहकार्य करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.
उद्योग विकास आयुक्त डॉ हर्षदीप कांबळे यांनी उद्योगांसाठी देण्यात येत असलेल्या विविध सोयी-सुविधांबाबत शिष्टमंडळास सविस्तर माहिती दिली. पादत्राणे निर्मिती उद्योगांसाठी राज्यात इको-सिस्टम तयार असून या पार्श्वभूमीवर उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेता येईल असे सांगितले.
क्रीडा क्षेत्रात फुटवेअरमधील उत्पादनांसाठी प्रसिद्ध
पॉउ चेन कॉर्पोरेशन कॅनव्हास आणि रबर फुटवेअरमधील उत्पादनांसाठी प्रसिद्ध असून क्रीडा क्षेत्रातील फूटवेअर आणि अॅक्सेसरीज निर्मितीमध्येही अग्रेसर आहे. अॅथलेटिक आणि कॅज्युअल पादत्राणे उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून
भारतात व्यवसाय वृद्धीसाठी ग्रुप उत्सुक आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.