जो निर्णय घेतलाय; त्याप्रमाणे पुढे जाणार : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 07 मार्च 2024 | फलटण | आगामी काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक आलेली आहे. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तीन आमदार असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटला पाहिजे अशी आम्ही आग्रही मागणी केली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय घडामोडी घडणार आहेत. याकडे सर्वांचेच लक्ष आहे. परंतु आम्ही सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला आहे; त्या निर्णयासोबतच आम्ही पुढे जाणार आहोत; असे मत सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “लक्ष्मी – विलास पॅलेस” या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुजवटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी फलटण शहरासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या निधींची व योजनांची माहिती यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!