दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२२ । फलटण । भारतीय संस्कृतीची जोपासना करणारे शैक्षणिक संकुल म्हणजे प्रोग्रेसिव्ह असे गौरवोद्गार माजी प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ श्री रवींद्र येवले सर यांनी वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले.
सरस्वती शिक्षण संस्थेच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य श्री.रविंद्र येवले सर, संस्थेचे संस्थापक संस्थापक श्री.पांडुरंग पवार भाऊ, सौ. सुलोचना पवार श्री.सुभेदार डुबल सर, संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, श्री.राजेंद्र भोसले, श्री.अशोक शिंदे ,श्री.राघू गायकवाड व इतर मान्यवरांसह प्राचार्य संदीप किसवे, पर्यवेक्षक अमित सस्ते, समन्वयिका सौ. माधुरी काटकर सौ.सुवर्णा निकम श्रीमती. योगिता सस्ते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर प्रशालेतील शिक्षिकांनी स्वागत गीताने मान्यवरांचे शब्दसुमनांनी व नंतर पुष्पगुच्छ व भेटकार्ड देऊन स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी समाजकल्याण प्रार्थना (मनशक्ती) म्हणण्यात आली. त्यानंतर शाळेच्या प्राचार्य श्री.संदीप किसवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकानंतर संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री पांडुरंग पवार (भाऊ)यांचा ७० वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला व त्यांना दीर्घायुष्यासाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ मध्ये उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी व संस्थेच्या वाटचालीत योगदान दिलेल्या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार देऊन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये श्री.सुशांत अहिवळे (कलाशिक्षक) सौ.रेश्मा कदम, सौ.जयश्री घाडगे, सौ.शिल्पा कदम ,सौ.सोनाली कोकरे या शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी श्री.आनंदराव शिंदे व सौ.ललिता नाळे यांना गौरवण्यात आले. त्यानंतर पारितोषिक प्राप्त शिक्षकांनी आपल्या संस्थे विषयीच्या भावना व्यक्त करून आभार मानले. श्री.रवींद्र येवले सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या यशस्वी वाटचालीची प्रशंसा केली व विशेष करून सांस्कृतिक मूल्यांची जोपासना विविध उपक्रम व कार्यक्रमाद्वारे होत असल्याबद्दल विशेष कौतुक करून सर्व शिक्षकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन व कार्यवाही या संदर्भात कौतुक केले. याप्रसंगी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. सुभेदार डबल सर व संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेची यशस्वी वाटचाल व त्यामध्ये आदरणीय भाऊंचे असलेले अमूल्य योगदान व अपार कष्ट याविषयी थोडक्यात आढावा घेतला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रोहिणी ठोंबरे व सौ. अमृता गोसावी यांनी केले.आभार श्री.राजेंद्र भिवरकर यांनी व्यक्त केले याप्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासत मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले.