दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२४ | फलटण |
धुळदेव (२३ फाटा, ता. फलटण) येथे शेतातील पाईपलाईन, पाण्याची टाकी या वस्तूंचे नुकसान केले म्हणून विचारणा केली असता, फिर्यादी सुवर्णा अर्जुन ननावरे (वय ४८ रा. धुळदेव, २३ फाटा, ता. फलटण) या महिलेवर कोयत्याने हल्ला करत, शिवीगाळ, दमदाटी करून तिचे घर पाडल्याची, तिच्या आंब्याच्या झाडांचे नुकसान केल्याची घटना घडली असून या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादी महिलेच्या लहान मुलालाही आरोपींनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही २५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
अर्जुन रामचंद्र ननावरे (वय ५२), सूरज अर्जुन ननावरे (वय २७, दोन्ही रा. धुळदेव, २३ फाटा, ता. फलटण)) अशी आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास म.पो.ना. हेमा पवार करत आहेत.