
सातारा – पाणपोईच्या उदघाटनप्रसंगी ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, दिलीप म्हेत्रे, अमर बेंद्रे, जयकुमार बेंद्रे व इतर.
स्थैर्य, 19 फेब्रुवारी, सातारा : ऐतिहासिक सातारा नगरीला मोठी सामाजिक परंपरा आहे. शहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास करण्यासाठी त्या- त्या भागातील नगरसेवकाचे योगदान महत्वाचे आहे. विकासात्मक वाटचाल करतानाच नगरसेवकाने समाजसेवक म्हणून काम केल्यास खर्या अर्थाने प्रभागाचा कायापालट होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
तीव्र उन्हाळ्यात प्रवासी तसेच नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रभाग क्र. 12 मध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून नगरसेवक दिलीप म्हेत्रे यांच्या माध्यमातून 8 ते 10 ठिकाणी पाणपोई सुरु करण्यात आल्या असून या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक म्हेत्रे, अमर बेंद्रे, रामभाऊ सपकाळ, जयकुमार बेंद्रे, अतुल काटकर, अतुल कांबळे, महेश बेंद्रे, विजय बेंद्रे, गणेश बेंद्रे, सिद्धार्थ निकोडे, चिदंबर काटवटे, आकाश बेंद्रे, क्षितिज बेंद्रे, सिद्धार्थ बेंद्रे, अमोल यादव, अजिंक्य कदम, विश्वास भोईटे, राजन गांधी, कौशिक कुलकर्णी, अभिजीत कुलकर्णी यांच्यासह प्रभागातील नागरिक तसेच जागृती विकास सामाजिक संस्थेचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, दिलीपशेठ हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत. आता त्यांच्याकडे नगरसेवक म्हणून या प्रभागाची जबाबदारी आहे. त्यांच्या माध्यमातून या प्रभागातील सर्व प्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. दिलीपशेठ हे नगरसेवक म्हणून नव्हे तर एक समाजसेवक म्हणून काम करतील, हे त्यांच्या पाणपोईच्या उपक्रमामुळे स्पष्ट होत आहे. या प्रभागाचा आदर्शवत कायापालट करण्यासाठी दिलीपशेठ आणि त्यांचे सहकारी निश्चितच प्रयत्न करतील, असा विश्वास ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

