
दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटणमधील बुधवार पेठेतील कृष्णनाथ चंद्रकांत बोराटे यांच्या घरासमोर ठेवलेला ९ हजार रुपये किंमतीचा एक तांब्याचा पाणी तापविण्याचा बंब चोरट्याने लंपास केल्याची फिर्याद बोराटे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही चोरीची घटना १ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री घडली आहे.
या चोरीचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार राणी फाळके करत आहेत.