जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज शोकसभेचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. 23 जुलै 2025 । फलटण । गेली ३०/३५ वर्षे फलटण तालुक्यात, किंबहुना सातारा जिल्ह्यात वृत्तपत्र क्षेत्राबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रा. आढाव सर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्यावतीने आज, बुधवार दि. २३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात येत आहे.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद फलटण तालुकाध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव सर यांचे दि. १८ जुलै रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराने नागपूर येथे दुःखद निधन झाले हे आपणास ज्ञात आहे.

या सभेला फलटण शहर व तालुक्यातील सर्व समाज घटकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!