
दैनिक स्थैर्य । दि.०१ जानेवारी २०२२ । सातारा । साताऱ्याजवळील देगाव रस्त्यालगतचे बंद घर फोडून चोरट्यांनी १.२१ लाखांचे सोने-चांदीचे दागिने चोरुन नेले. याबाबतची तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हेमा सतीश सूर्यवंशी (रा. अमरलक्ष्मी, सातारा) या मुळच्या सांगली जिल्ह्यातील नेवरी (ता. कडेगाव) येथील असून त्या कामाच्या निमित्ताने देगाव रोडलगत अमरलक्ष्मी परिसरात एका घरात भाड्याने राहत आहेत. गेल्या आठवड्यात शुक्रवार, दि. २४ रोजी त्या घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, बुधवार, दि. २९ रोजी त्या घरी आल्या असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
चोरट्याने हेमा सुर्यवंशी यांच्या घरातून १.२१ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले असून यामध्ये झुमके, वेल, अंगठी, लटकण, जोडली, बिछवे असा ऐवज आहे. याबाबतची तक्रार त्यांनी गुरुवार, दि. ३0 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातारव गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक व्ही. व्ही. शिंदे तपास करत आहेत.