दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील तांबवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शाळा पूर्वतयारी अभियानात कार्यरत माता गटातील महिलांचे प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन कौतुक करण्यात आले व यावर्षीची निपुण लक्ष्य गाठण्यासाठीची सुरूवात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून निपुण शपथ घेऊन करण्यात आली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये पायाभूत साक्षरता व अंक ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले असून त्यासाठी निपुण भारत मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये माता गट चांगल्याप्रकारे कार्य करीत असल्याने त्यांचा कौतुक सोहळा घेण्यात आला. यावेळी सौ. रूपाली जगताप, उषा चव्हाण, अश्वीनी माळवदकर, सौ. निलम गायकवाड, सौ. वनिता धुमाळ, सौ. सुप्रिया शिंदे, सौ. मयुरी शिंदे, सौ. ज्योती शिंदे, सौ. माधुरी माने, श्रीमती करुणा शिंदे, सौ. रूपाली जगताप, सौ. रूपाली शिंदे, सौ. रेश्मा सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच सौ. नीलम गायकवाड, उपसरपंच श्री. महेंद्र शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. आबासाहेब शिंदे, श्री. गजानन शिंदे, श्री. रविंद्रनाथ शिंदे, इतर मान्यवर तसेच गोरड मॅडम, चांगण मॅडम, मणेर सर व घोडके मॅडम उपस्थित होत्या.