
स्थैर्य, नागठाणे, दि. १९ : वेचले(ता.सातारा) येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलीच्या वडिलांनी हि फिर्याद दाखल केली आहे.
सोमवारी रात्री घरातील सर्व जेवण करून झोपले.रात्री उशिरा मुलीचे वडील लघुशंकेसाठी उठले असता घरात अल्पवयीन मुलगी नसल्याचे निदर्शनास आले.त्यांनी मुलीचा परिसरात सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने मंगळवारी उशिरा त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला.पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.