स्थैर्य, कुडाळ, दि.०७: कुडाळ, ता. जावली येथे दारूची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी मेढा पोलिसांनी दोनजणांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगेश भरत निकम उर्फ मंगेश रामचंद्र निकम, वय 29, रा. करंदी तर्फ कुडाळ, ता. जावली, बाबू हणमंत बेलकर, वय 27, मुळ रा. मुडखेड, नांदेड सध्या रा. पाईप लाईन साईट, करंदी तर्फ कुडाळ,ता.जावली अशी दोघांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, 6 रोजी सकाळी 06.40 च्या सुमारास पियूष चौक, कुडाळच्या हद्दीत रोडवर दारूची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मेढा पोलिस ठाण्याचे सपोनि अमोल माने यांना मिळाली. त्यानंतर त्याठिकाणी मेढा पोलिसांनी सापळा लावला असता दोनजण देशी, विदेशी दारुची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आल्याचे मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी दारूच्या 5760 रुपयांच्या 96 बाटल्या, 3200 रुपये किंमतीच्या 20 विदेशी दारुच्या बाटल्या, दोन मोबाईल हँडसेट, एक काळ्या रंगाची बजाज पल्सर दुचाकी असा 62 हजार 960 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार ओव्हाळ तपास करत आहेत.