वाईत पोलीस असल्याची बतावणी करून बुलेट घेऊन पसार झालेल्या अनोळखी इसमावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२२ । वाई । मी पोलीस असून बुलेट खरेदी करावयाची आहे. अशी बतावणी करून पाचगणीच्या एकाची सुमारे एक लाख रुपये किंमतीची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट टेस्ट राईडच्या नावाखाली घेऊन पसार झालेल्या एका अनोळखी इसमावर आज वाई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बोस्को एम परेरा (रा.पाचगणी) यांनी आज पोलिसात तक्रार दिली. श्री.परेरा हे येथील बावधन नाक्यावरील गणेश ऑटो गैरेंज मध्ये बुलेट (क्र. के ए १८इ एच ५२३६) मधील ऑईल बदली करण्यासाठी आले होते. त्यावेळी बुलेट विकायची असल्याचे त्यांनी सांगितले होते. दुसऱ्या दिवशी एका अनोळखी इसमाचा फोन आला. त्याने बुलेट बाबत चौकशी करून वाईला बुलेट घेऊन बोलाविले. त्यानुसार ३ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.४५ वाजता आलो. त्यावेळी अनोळखी इसमाने मी पोलीस आहे. मला बुलेट खरेदी करायची आहे. अशी बतावणी करून टेस्ट ड्राईव्ह करिता बुलेट घेऊन गेला तो परत आलाच नाही. त्याचा फोनही लागत नाही. त्याने विश्वासघात करून बुलेट परत न देता आपली फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वाई पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!