दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । फलटण । शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेबाबत फडतरवाडी येथील पृथ्वीराज फडतरे या युवकावर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आक्षेपार्ह विधानामुळे फलटण तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हातात घ्या पण कायद्याचा सन्मान प्रत्येकाने करणे आवश्यक आणि अपेक्षित आहे. तसेच एकमेकाचा आदर राखला गेला पाहिजे. पदाची व थोर कर्तुत्ववान व्यक्तीची प्रतिष्ठा भंग होता कामा नये. एकमेकाबद्दल व्यक्तीद्वेष नसावा. तर आणि तरच समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तानाजी बर्गे, रा. पवारवाडी, ता.फलटण यांनी पोलिस स्टेशनमध्ये अशी तक्रार दिली आहे की, अविनाश फडतरे मित्र समूह या व्हाॅट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पृथ्वीराज फडतरे या युवकाने महाराष्ट्रातील कोट्यवधी शिवसैनिकांसाठी आदरणीय असणा-या शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेवर आक्षेपार्ह विधान करुन शिवसैनिकांच्या भावना एकप्रकारे भडकवल्या आहेत, कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. याचा निषेध करत शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, प्रभारी फलटण तालुका प्रमुख विकास नाळे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख विश्वास चव्हाण, ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी जिल्हाप्रमुख शैलेंद्र नलवडे, फलटण तालुका सोशल मिडीया प्रमुख तानाजी बर्गे, विभाग प्रमुख किसन यादव, ज्येष्ठ शिवसैनिक मच्छिंद्र भोसले, ग्राहक संरक्षण कक्षाचे उपशहर प्रमुख भारतशेठ लोहाना, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, निलेश जाधव, आदी शिवसैनिक उपस्थित होते.