युपीहून विना परवाना दुचाकीने आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल


स्थैर्य, सातारा, दि. 4 : जिल्ह्यात विना परवाना प्रवेश बंद असताना जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग करून उत्तर प्रदेशातून येवून सातार्‍यात राहत असलेल्या दोघांना शाहुपुरी पोलिसांनी आज अटक केली. विशेष म्हणजे हे दोघे युपीहून चक्क दुचाकीने आले होते.

याबाबत माहित अशी, शाहूपुरी पोलिसांची गस्तीवर असताना गोरखपुर बस्ती (उत्तर प्रदेश) येथून एकजण नातलगास घेवून वृंदावन कॉलनी, दौलतनगर, सातारा येथे आल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी जावून त्याठिकाणी खात्री केली असता तेथे सुरजकुमार श्रीमुलचंद वर्मा वय 21 वर्षे, रा. गोरखपुर बस्ती उत्तरप्रदेश सद्या रा. वृंदावन कॉलनी दौलतनगर सातारा आणि शाम मुन्नी वर्मा वय 20 वर्षे रा. गोरखपुर बस्ती उत्तरेप्रदेश येथून टु-व्हीलरवरून दि. 30 जून रोजी सकाळी 10 वाजता दौलतनगर येथे आल्याचे आढळून आले. यासदंर्भात त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे भंग केल्याप्रकरणी   त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि  महाराष्ट्र कोविड कायदा कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी धनंजय शामराव कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!