जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या वेळेनंतर दुकाने सुरु ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एस. एस. कम्युनिकेशन मोबाईल शॉपचे मालक महेश पांडुरंग कुलकर्णी, रा. शुक्रवार पेठ, सातारा, गोकूळ दूध शॉपीचे मालक स्वप्निल अशोक शिंगटे रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी, सातारा व बिग बाईट हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी मालक चिराक मुकेश कोटक रा. रविवार पेठ, सातारा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीस नाईक अमोल साळुंखे यांनी तक्रार दिली असून पुढील तपास हवालदार बी. एस. सणस करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!