
स्थैर्य, सातारा, दि.३: लिंब, ता. सातारा येथे महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अजय यदू चव्हाण, रा. लिंब, गणेश बजिरंग चव्हाण रा. लिंब, मुळ रा. मेढा, ता. जावली अशी संशयीतांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, संबंधित महिला घरात स्वयंपाक करत असताना अजय यदू चव्हाण व गणेश बजिरंग चव्हाण हे दारूच्या नशेत घरात शिरले. त्यांनी फिर्यादी महिलेचा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. पीडीत महिलेने आरडा-ओरडा केल्याने तिचे सासू-सासरे तिला वाचवण्याकरीता लगेच तेथे आले. यानंतर संशयितांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व अंगणात पडलेला दगड सासरे यांच्या कपाळावर मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही संशयीतांवर गुन्हा दाखल झाला असून हवालदार रजपूत तपास करत आहेत.