
दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२२ । सातारा । मारहाणीसह विनयभंग केल्याप्रकरणी सहा जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 डिसेंबर रोजी चिंचणेर वंदन, ता. सातारा येथील एक विवाहिता तिच्या नवऱ्यास व मुलास का मारले, असा जाब विचारण्यास गेली असता राजेंद्र निवृत्ती बर्गे, विठ्ठल निवृत्ती बर्गे, प्रवीण निवृत्ती बर्गे, जाधवराज राजेंद्र बर्गे, धीरज दिलीप घोरपडे, सुनिता राजेंद्र बर्गे सर्व रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा यांनी तिचा विनयभंग करून तिच्या मुलास डोक्यात मारून जखमी केले आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस नाईक पिसाळ अधिक तपास करीत आहेत.