
दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण येथील शुक्रवार पेठेतील ग्रामीण पोलीस स्टेशनजवळ असलेल्या आरोपी गुलफाम शेरशहाँ शेख यांनी फलटण नगरपालिकेची परवानगी न घेता स्वत:च्या जागेत बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी त्यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद नितीन देवदास वाळा यांनी दिली असून या प्रकरणी अधिक तपास पो.ना. राजेंद्र घाडगे करत आहेत.