दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२२ । सातारा । कुमठे (ता.सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे शिपाई धनंजय रामचंद्र नवले यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी येथीलच मनोज प्रकाश वाघमारे उर्फ सोन्या (वय.३०) याच्याविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मंगळवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला.बुधवारी पहाटे त्याला बोरगाव पोलिसांनी कुमठे येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले.त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सोमवारी सायंकाळी कुमठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कामावर असताना धनंजय नवले यांना मनोज वाघमारे उर्फ सोन्या याने दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केली.या घटनेमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते.बोरगाव पोलिसांच्या मध्यस्तीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.
मंगळवारी रात्री उशिरा कर्मचारी धनंजय नवले यांनी मनोज वाघमारे उर्फ सोन्या याच्याविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाल करत मनोज वाघमारे उर्फ सोन्या याला ताब्यात घेऊन अटक केली.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर करत आहेत.