
दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२४ | फलटण |
कुरवली खुर्द (तालुका फलटण, जिल्हा सातारा) येथील विवाहिता मयुरी सूरज गोळे (वय २७) हिस नवरा सूरज मनोहर गोळे, नणंद अर्चना राहुल राजगुडे (रा. सोनगाव, ता. बारामती, जि. पुणे), सासू सुनंदा मनोहर गोळे व सासरा मनोहर सदाशिव गोळे यांनी माहेरवरून २० लाख रुपये हुंडा आणण्यासाठी व चारित्र्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण केली. तसेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वरील चौघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विवाहितेचे वडील प्रभाकर बाळासो जाधव (रा. देशमुखवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.