दैनिक स्थैर्य | दि. १ मार्च २०२४ | फलटण |
फलटण शहर पोलीस ठाणेच्या हद्दीत दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीस गस्त करीत असताना दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणार्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाणे येथे कलम ८५(१) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
राहुल भगवान पवार (वय ४२, रा. हरिबुवा मंदिर शेजारी, मलठण, फलटण), श्रीराज जितेंद्र डोईफोडे (वय २९, रा. रविवार पेठ, फलटण), नितीन बाळू साळुंखे (वय ३८, रा. गडसोली मैदान, फलटण) व मयूर जयवंत कुंभार (वय ३२, रा. कुंभार गल्ली, रविवार पेठ, फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.
फलटण शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे दारू पिऊन रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा करणार्या मद्यपींवर जरब बसणार आहे.