जमिनीत अतिक्रमण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२३ | फलटण |
विंचुर्णी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील आपल्या जमिनीत दि. २० सप्टेंबर २०२२ ते दि. ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत अतिक्रमण करून हद्दीच्या खुणा मुजविल्याप्रकरणी तसेच शिवीगाळ करीत खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी पाचजणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हणमंत महादेव अहिवळे (रा. विंचुर्णी) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिपक बापुराव अहिवळे, सविता दिपक अहिवळे, इंदुबाई बापुराव अहिवळे, आनंदा चिमाजी अहिवळे, मायावती आंनदा अहिवळे (सर्व राहणार विंचुर्णी, ता. फलटण, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!