जुगार व मटका खेळणार्‍या आठजणांविरोधात गुन्हा दाखल; ८,३२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १८ जुलै २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील आसू, मिरगाव, राजाळे व सांगवी गावच्या हद्दीत १५ जुलै ते १७ जुलै २०२३ दरम्यान विविध ठिकाणी छापा टाकून जुगार व मटका खेळणार्‍या आठजणांविरोधात फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी जुगाराचे साहित्यासह एकूण ८,३२५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

राजेंद्र बापूराव गवळी (रा. खताळपट्टा, तालुका बारामती, जिल्हा पुणे), शिवाजी भोसले (रा. सोनगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे), गणेश बाळासो बोराटे (रा. आसू, तालुका फलटण), अवकाश ज्ञानदेव पवार (रा. आसू, तालुका फलटण), संपत पवार (रा. आसू), सतीश जनार्दन पवार (रा. आसू, तालुका फलटण), विकास दौलतराव पवार (रा. आसू, तालुका फलटण) व जयकुमार शंकरराव पवार (रा. मलठण, ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर व फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना प्रभावीपणे मोहीम राबवून जास्तीत जास्त गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


Back to top button
Don`t copy text!