दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
गुणवरे (ता. फलटण) येथील फिर्यादी सूर्यकांत साधू ढोबळे (रा. ढोबळे वस्ती, खटके वस्ती, ता. फलटण) हे मित्र विजय रायते याच्याबरोबर २४ ऑगस्ट रोजी शिंगणापूर येथे गेले असताना तेथून परत येताना आंदरूडजवळ या दोघांची भांडणे झाली. त्यावेळेस विजय रायते याने फिर्यादी सूर्यकांत ढोबळे यास जातीवाचक शिवीगाळ केली व बोटाला चावा घेऊन मारहाण केली.
या घटनेनंतर फिर्यादी हे घडलेला प्रकार सांगण्यासाठी आरोपी विजय रायते याच्या घरी गुणवरे येथे गेल्यानंतर तेथे विजय रायते याचे वडील काशिनाथ ठकसेन रायते व विजय रायते या दोघांनी फिर्यादी यांना परत मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार फलटण ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी विजय रायते व त्याचे वडील ठकसेन काशिनाथ रायते या बापलेकावर अनुसूचित जाती-जमाती अधिनियमाच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपअधीक्षक राहुल धस करत आहेत.