मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२३ | फलटण |
मांडवखडक (ता. फलटण) येथील एका १६ वर्षांच्या निर्भया मुलीस दि. १० ऑगस्ट २०२३ रोजीच्या रात्री राहत्या घरातून फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी निर्भयाच्या आईने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यातील निर्भया ही गोरी, केस काळे लांब, उंची ५ फूट, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, अंगात काळ्या रंगाचा, त्यावरती पांढर्‍या रंगाचा गोल ठिपक्या असणारा टॉप व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, तपकिरी रंगाची साधी बॅग, बंद पडलेला मोबाईल व जिओ कंपनीचे सिमकार्ड बरोबर नेले आहे.

या प्रकरणी अधिक तपास सपोनि हुलगे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!