विवाहितेचा विनयभंग व मारहाण प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल


स्थैर्य, वाई, दि. १२: वाई शहरातील एका विवाहित महिलेला तु मला खूप आवडेत असे म्हणून कृष्णा नदीच्या घाटावर विकास विजय हगवणे याने अडवून हात पकडला. त्या महिलेने पतीला घरी सांगितले. त्यावरुन चिडून जावून दि. 11 रोजी सकाळी 9.30 वाजता विकास विजय हगवणे याने त्या महिलेला व तिच्या पतीला लाकडी दाडक्याने मारहाण केल्याची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की वाई येथील विवाहित महिलेच्या मुलाला एका ठिकाणी क्लास लावला आहे. त्याच क्लास चालकाच्या घरातील विकास विजय हगवणे हा युवकाने ती महिला कृष्णा घाटावर धुणे धुण्यास दि. 10 रोजी सायंकाळी 4 वाजता गेली होती. तेव्हा विकास याने तिला अडवून तु मला खुप आवडतेस अशी विचारणा केली. त्यावर त्या महिलेने माझे लग्न झाले आहे असे म्हटले तरीही त्याने तिला अडवून छेडखानी केली. धुणे धुवून परत जातानाही त्यान अडवून हात पकडला. त्या महिलेने घरी जावून त्याच्या आईला सांगितले. सायंकाळी घरात कपडे वाळत घालत असताना मारहाण करुन निघून गेला. ही बाब त्या महिलेने पतीला सांगितली. विकासच्या आईने आणि भावाने घरी येवून माफी मागितली होती. परंतु दुसऱया दिवशी सकाळी दि.11 रोजी 9.30 वाजता विकासने लाकडी दांडक्याने पतीपत्नीला मारहाण केली. याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!