निंभोरे येथे जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य | दि. १ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
निंभोरे (ता. फलटण) गावच्या हद्दीत नीरा उजवा कॅनॉलजवळ जातीवाचक उच्चार, शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी सौ. कांचन रमेश निंबाळकर (रा. निंभोरे) या महिलेवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद धीरज गौतम जगताप (वय ३२, रा. साखरवाडी, ता. फलटण) यांनी पोलिसात दिली आहे.

या घटनेची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी निंभोरे (ता. फलटण) गावचे हद्दीत नीरा उजवा कॅनालजवळ सौ. कांचन रमेश निंबाळकर (रा. निंभोरे) यांनी फिर्यादी यांना ‘तू ट्रॅक्टर घेऊन येथे का आलास, तसेच त्यांनी फिर्यादी याला तू महार आहेस, तू येथे माती उचलायची नाही’, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केली, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.

या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वाई भालचिम करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!