दैनिक स्थैर्य | दि. ६ एप्रिल २०२४ | फलटण |
सुरवडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत आरोपी विमल कुंडलिक धायगुडे (वय ३७, सध्या रा. सुरवडी, ता. फलटण, मूळ रा. बाळू पाटलाचीवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) ही महिला दि. तिच्या खानावळीच्या आडोशाला दि. ५ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बेकायदा देशी दारूच्या ९० मिलीच्या १६ बाटल्यांसह चोरटी दारू विक्री करताना आढळून आली.
या प्रकरणी आरोपी विमल धायगुडे हिच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तिच्या ५६० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या घटनेचा अधिक तपास पो. हवा. पिसे करत आहेत.